Take a fresh look at your lifestyle.

सिद्ध व्यक्तींनी कोणत्या स्थितीत ध्यानसाधना केली?

ध्यानाशिवाय सत्य समजत नाही.

राजा शुद्धोधनाचा पुत्र सिद्धार्थ गौतम.सिद्धार्थ नावातच सगळं विश्व सामावलेलं आहे. सिद्ध म्हणजे सत्य ज्ञानार्थ मिळवण्यासाठीच जन्म घेतलेला.
ऐश्वर्यातच जन्म झाला,कशाचीही कमी नव्हती. पण पोट रिकामं होतं.त्या ज्ञानाची भुक लागली होती,ज्याचा कुणाला प्रश्न पडत नाही.
जन्म,जरा,मरण पाहिलं आणि ती ज्ञानभुक जागी झाली.राजपाठ सोडला,प्रपंच त्यागला.साऱ्या सुविधा पायाशी लोळण घेत असताना आपण असा विचार करू शकतो का?बुद्ध होणं सोपं नाही. गौतम बुद्ध खडतर आणि यशस्वी तपस्येच नाव आहे.दिव्य ज्ञानाच्या बोधानं बुद्धत्व प्राप्त होतं.रामाचंही जीवन आपल्या समोर आहे.राजपुत्र असुनही सर्व ऐश्वर्य त्यागुन प्रभु श्रीरामचंद्र होण्यापर्यंतचा प्रवास दुःखानं भरलेला आहे. अनेकदा आपण म्हणतोही टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
इतक्या टोकाची साधना आम्हाला करायचीच नाही. ती आम्हाला अशक्य आहे म्हणुनच मी असं विधान करतो आहे. पण मनुष्य म्हणून जन्माला आल्याचा काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. आमची पोटं तुडुंब भरलेली असतील तर ज्ञानाची भुक लागणारच कशी?ज्ञानही काय मिळवायचय?स्वतःची ओळख करून घ्यायची बस्स…..
ध्यानसाधना त्यासाठी आवश्यक आहे. कारण ध्यान जागं झाल्याखेरीज जगण्याची सत्कला प्राप्त होणार नाही.
रामकृष्णहरी