Take a fresh look at your lifestyle.

अंड्यात असताना पिल्लाला ऑक्सिजन कसा मिळतो?

रंजक माहिती जाणून घेवूयात.

आपल्या प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. पक्षी अंडी घालतात. मात्र अंडी पूर्णपणे बंद असतात. यावर तुम्ही कधी विचार केलाय का? की, जेव्हा अंडं पूर्णपणे बंद असतं, तेव्हा पिल्लू जिवंत कसं राहतं? त्याला ऑक्सिजन कसा मिळतो? चला, तर यामागील कारण जाणून घेऊयात…
अंड्याला नीट पाहिलं तर लक्षात येईल की, अंडं हे एक कडक कवच आहे. ते पूर्ण बंद असतं. मात्र त्याखाली एक पडदा असतो. जे सहसा दिसत नाही. या पडद्याच्यामध्ये एक लहान वायु पेशी असते. त्यात ऑक्सिजन भरलेला असतो.
हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कोंबडीच्या अंड्याच्या कवचामध्ये तब्बल 7,000 पेक्षा अधिक छिद्रे असतात. भिंगाच्या साहाय्याने अंड्याकडे बारकाईने पहिले तर त्याच्या आत लहान छिद्रं दिसतील. यातून केवळ ऑक्सिजनच आत जात नाही, तर कार्बन डायऑक्साइडही बाहेर पडतो. तसेच पेशींच्या मदतीने पिल्लांना पाणीही मिळतं.