Take a fresh look at your lifestyle.

ध्यानातुन आत्मसन्मानाकडे जाण्याचा मार्ग !

आत्मोन्नती महत्वाची का आहे?

ध्यानधारणेला आपण बसण्याचा प्रयत्न करत असाल तर काही प्रश्न निर्माण व्हायलाच हवेत.आपण ते प्रश्न मला विचावेत.त्याशिवाय पुढे जाता येणार नाही.आपल्या मुलांनाही आत्मोन्नतीसाठी ध्यान ही क्रिया अत्यंत लाभदायक आहे.
आर्थिक उन्नत होण्यासाठी कोण झगडत नाही?पण ती उन्नती सन्मानीत मार्गाने करता यावी हा विचार आत्मोन्नतीनेच शक्य आहे. विविध मानसिक आजारांपासून वाचायचं असेल तर,विनाशक वृत्ती लोप व्हावी असं वाटत असेल,आपल्या बरोबरच आपल्या मुलांनी नितीचक्राचे अनुसरण करावे आणि त्यायोगे वृद्धापकाळात ते आपला आधार बनावेत असं ज्यांना वाटत असेल त्या सर्वांसाठी ध्यान अतिउत्तम गती प्राप्त करून देणारे आहे.
आपण ध्यानाला बसल्यावर काय समस्या येणार आहेत, या मी येथे कथित करण्यापेक्षा तुम्ही प्रश्न उपस्थित केले तर चहुबाजूंनी त्यावर विचारमंथन होईल. आणि आपली ध्यानवाट सुकर होईल.भविष्यात कुणाला अध्यात्मिक मार्ग चोखाळावा वाटला तर त्यात आपण आत्मानंदाच्या जवळ खूप लवकर पोहोचाल असं हे तंत्र आहे. उद्याच्या भागापर्यंत काही प्रश्न येण्याची मी वाट पहात आहे.
रामकृष्णहरी