Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 6 फेब्रुवारी 2022  

0

 

▪️मेष : फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची मदत होईल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल.
▪️वृषभ : स्त्रियांशी मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील.
▪️मिथुन : कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल. घरातील साफसफाई काढाल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल.
▪️कर्क : अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका. आरोग्याची काळजी घ्यावी.
▪️सिंह : बौद्धिक चुणूक दाखवता येईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. नवीन लोक संपर्कात येतील. तिरसटपणे वागू नये.
▪️कन्या : वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल.
▪️तूळ : लिखाणाला बळ मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल. साहसाने कामे हाती घ्याल.
▪️वृश्चिक : व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. खर्च वाढू शकतो. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल.
▪️धनू : शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल. दिलदारपणे वागाल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल.
▪️मकर : काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. सामाजिक सेवेत हातभार लावावा. पारमार्थिक उन्नती साधता येईल.
▪️कुंभ : काटकसर करण्याकडे कल राहील. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवाल. आवडी-निवडीवर भर द्याल. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे.
▪️मीन : खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्व‍च्छंदीपणे वागाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल.
Leave A Reply

Your email address will not be published.