Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 5 फेब्रुवारी 2022  

0

 

▪️मेष : जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल. कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत.
▪️वृषभ : दिवस काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका. व्यवसायातून चांगला लाभ होईल.
▪️मिथुन : कामात वारंवार बदल करू नका. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल. सामाजिक वजन वाढेल.
▪️कर्क : खाण्या पिण्याचे पथ्य पाळा. पित्त विकार बळावू शकतात, गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल.
▪️सिंह : मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल. पैज जिंकता येईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
▪️कन्या : वाहन विषयक कामे होतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरात काही बदल कराल. जोडीदाराविषयी समाधानी असाल.
▪️तूळ : आत्मविश्वास बाळगावा लागेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. मानसिक शांतता जपावी.
▪️वृश्चिक : स्व मतावर ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. जुगारातून लाभ संभवतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल.
▪️धनू : घरात सर्वांशी प्रेमळपणाने वागाल. मानसिक शांतता लाभेल. प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
▪️मकर : हातून एखादे सत्कार्य घडेल. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा. संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल.
▪️कुंभ : मित्रांशी सलोखा वाढवावा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.
▪️मीन : तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. सौंदर्य वादी नजर बाळगाल. लाघवीपणे सर्वांना आपलेसे कराल.
Leave A Reply

Your email address will not be published.