Take a fresh look at your lifestyle.

चित्तमंदिरात शक्तीस्वरुप स्थापना असली पाहिजे !

ध्यान करणं म्हणजे शक्ती मिळवणे होय.

चित्तात तिच प्रतिमा,मुर्ती, व्यक्ती कायम केली पाहिजे जे स्वरूप पहाताच चैतन्य निर्माण होईल. इथे मनाची भुमिका अत्यंत महत्त्वाची आहे.मनाने त्याला मान्यता दिली तरच ते कायम होईल. मनधारणा फार कठीण नाही. पण त्यावरही भरपूर कष्ट घ्यावे लागतील. दुसऱ्याची मनधरणी करणे आपल्याला जमतेच असे नाही पण इथे मात्र प्रयत्नाने ते शक्य करावेच लागेल.
धारणेला कालपरत्वे त्यात बदल करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी.धारणा निश्चित झाल्यावरच ध्यान प्रक्रियेत उतरता येईल.ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत.बिंदु त्राटक,ज्योती त्राटक,कुंभक,इ.अनेक पद्धती आहेत. पण आपण विचारात घेत असलेली प्रक्रिया ही खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया आहे.
अज्ञान नाहिसे झाले की होणारा आनंद हा चितस्वरुप असल्याने तो निर्भेळ असणार आहे. चित्तात स्थिरता प्राप्त करणारा असेल.उद्याच्या भागात आपण प्रत्यक्ष ध्यान धारणा यावर चिंतन करु.
रामकृष्णहरी