Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸4 फेब्रुवारी 2022

▪️मेष : गप्पांच्या मैफलीत रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. नवीन ओळखी वाढतील.
▪️वृषभ : स्थावरच्या कामात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. कमिशनमधून फायदा संभवतो.
▪️मिथुन : तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाजोगी खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.

▪️कर्क : मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल. कल्पना शक्तीला वाव देता येईल.
▪️सिंह : काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता.
▪️कन्या : भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल.

▪️तूळ : स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते.
▪️वृश्चिक : लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका. दिवस खटपटीत जाईल.
▪️धनू : वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.

▪️मकर : डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत. काही कामे खिळून पडू शकतात. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो.
▪️कुंभ : सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका. मुलांची चिंता लागून राहील.
▪️मीन : प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते.