Take a fresh look at your lifestyle.

ध्यानधारणा कुणाला करणं शक्य आहे?

जीवनाचं महत्त्व कळालय त्या प्रत्येकाला.

अध्यात्माकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय साधारण मनुष्याला काहीही मिळणार नाही. काहीही म्हणजे आत्मशांतीकडे जाणारं समाधान मिळण्यासाठी केलेली खटपट.आपण एखाद्या महाराजांकडे जाल आणि त्यांनी तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या तर तुम्ही हरकुन जाता.
आपल्या खिशात शंभर रुपये आहेत हे दुसऱ्याने सांगितले तर आश्चर्य वाटेल पण त्याला भुलुन जे काही आपण कराल तो केवळ मुर्खपणा.आपल्या स्वतः विषयी दुसऱ्याकडुन जाणुन घेण्याच्या प्रक्रीयेला शहाणपणा म्हणता येईल का?वास्तविक आपणच आपल्याविषयी खूप काही जाणत असतो.पण त्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही.कारण बाह्यांगाने जगण्याची सवय चित्ताकर्षणाचा मुख्य विषय झाला आहे.
चित्त असा व्हिडीओ प्रोजेक्टर आहे की तेथे कल्पना केली तरी प्रतिमा तयार होते.टि.व्ही.चा रिमोट हातात असुनही नको ते पहातोच ना आपण?मोबाईल फोन हातात असुनही नको ते पहातोच ना आपण?या वृत्तीलाच चित्ताकर्षण म्हणतात.
आपल्या चित्तात कोणती चित्र कायम करायची आणि कोणती बाहेर हटवायची याचं नियोजन आपल्यालाच करावं लागणार आहे. मन,बुद्धी यांची यात मदत लागणार आहे. सुक्ष्म अहंकारही जोपासावा लागणार आहे. चित्ताच्या स्थिरीकरणासाठी योग्य चित्राची निवड हा पहिला अग्रक्रमाने ठरवण्याचा विषय आहे.कोणतं चित्र निवडाल?पाहु पुढील भागात.
रामकृष्णहरी