Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 1 फेब्रुवारी 2022  

▪️मेष : कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. 
▪️वृषभ : कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल.
▪️मिथुन : मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
▪️कर्क : पैज जिंकता येईल. कलेला पोषक वातावरण मिळेल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदारा बरोबर गप्पा-गोष्टी कराल.
▪️सिंह : वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात.
▪️कन्या : ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा.
▪️तूळ : नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल.
▪️वृश्चिक : आनंदाने एकमेकांना मदत कराल. घरात टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल.
▪️धनु : निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल. गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल.
▪️मकर : बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल.
▪️कुंभ : मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल.
▪️मीन : सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल.