Take a fresh look at your lifestyle.

योग्य विचारांनाच प्रवेश देण्याची क्रिया शिकायला हवी !

अविचारानेच अस्थिरता आहे.

नास्तिक व्यक्तीसाठी सुद्धा ध्यानधारणा हेच तंत्र आहे. त्याला हवे तर वेगळे नाव द्या.मेडिटेशन म्हणा हवं तर.मनोस्थैर्य हेच मस्त जगण्याचा पाया आहे हे कायम लक्षात ठेवा.बाह्य उपचारांनी मन स्थिर झाल्यासारखे वाटेल.पण ते स्थिर झालेले नसते,ते बधिर झालेले असते.उपचारांचा अंमल कमी झाला की पुर्वस्थिती प्राप्त होते.मनाची निरंतर स्थिरता अशा उपचारांतुन कशी मिळणार?
गौतम बुद्धांना काही लोक अभद्र भाषेत बोलत होते.पण ते निर्विकार होते.हा दृष्टांत आपण मागच्या चिंतनात घेतला आहे त्यामुळे थोडक्यातच घेतला आहे. ते निर्विकार आहे हे पाहुन बोलणारेही अवाक झाले. न रहावुन त्यांनी बुद्धांना विचारलं तेव्हा ते म्हणाले,”तुम्ही लाख अभद्र बोलाल पण ते स्विकारायचे की नाही हे माझ्यावर अवलंबून आहे.नको ते विचार अस्विकार करता आले पाहिजे.
राजहंस व्हायचं असेल तर नेमकं ग्रहण करण्याची शक्ती मिळवता आली पाहिजे.अविचारांना मनात प्रवेश नाकारला की बरचसं डोकं हलक होणार आहे.आपल्याला वारंवार हा प्रश्न पडेलच की हे शक्य आहे का?हो हे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणारी ध्यान आणि धारणा आपण शिकायला हवी.गुरुबंधनं पाळुन मी पुढील काही भागांत हे तंत्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या दरम्यान काही प्रश्न आपल्याला नक्कीच पडायलाच हवेत आपण ते जरूर विचारावेत.
रामकृष्णहरी