Take a fresh look at your lifestyle.

मांडओहोळ प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी ७ फेब्रुवारीला आवर्तन !

पारनेर : मांडओहोळ धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ७ फेब्रुवारीला तर उन्हाळी आवर्तन‌ १ एप्रिलला सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. आमदार लंके यांच्या उपस्थितीत आवर्तनासह इतर विषयावर चर्चा करण्यासाठी विश्रामगृहावर मांडओहोळ कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
नगर येथील सिंचन शाखेचे मुख्य अभियंता व्हि.टी.शिंदे व ए.डी.मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
सुभाष भागुजी ढोकळे, कर्जुले हर्याच्या सरपंच सौ. संजीवनी राजाराम आंधळे,खंडू येशु टोपले, रविंद्र भिमाजी झावरे, संजय कुंडलिक शिंगोटे ,योगेश भानुदास गागरे, एकनाथ नारायण सुडके, सिंचन शाखा अभियंता ए.डी.मोरे श्रीम. अ. सो. वेताळ,सौ वर्षा भिमराज मुळे, कृषी अधिकारी एस .बी. बनकर, एस. बी. ठाणगे, संग्राम रंगनाथ उंडे आदी. उपस्थित होते.
रब्बी हंगाम- २०२१/२२ मध्ये मांडओहोळ मध्यम प्रकल्पाचे उपलब्ध पाणी, पिण्याचे पाण्याचे आरक्षणा व कालव्यास सोडण्यात येणारे पाणी याचा आढावा घेण्यात आला.या बैठकीत रब्बी हंगाम २०२१-२२ चे आवर्तन दि. ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी सोडण्याचे ठरले.उन्हाळ हंगाम २०२१-२२चे आवर्तन दि. ०१ एप्रिल २०२२ रोजी सोडण्याचे ठरले.