Take a fresh look at your lifestyle.

सत्याचा अनुभव सर्वांना सारखाच येतो !

सत्याला साक्षीदार लागत नाही.

आपल्याला भासणारी गोष्ट खरी की खोटी हे वेळेतच कळायला हवे.भ्रमाने पकडलेले सत्य एक दिवस सोडावे लागते आणि ते असत्य आपण जीवनभर सत्य समजल्याचा मनस्ताप खूप त्रास देणारा ठरतो.मला जे दिसतय किंवा अनुभवास येत आहे ते सत्य असेल तर भविष्यात विवंचना निर्माण होत नाही. उदा.वारा डोळ्यांना दिसत नाही, त्यातला प्राणवायू डोळ्यांना दिसत नाही पण त्याला कुणीही नाकारू शकणार नाही. कारण ते जाणण्यासाठी त्वचा हे माध्यम आहे आणि स्पर्श त्याचा अनुभव आहे.
आता आपण मुख्य विषयाकडे येऊ.संत म्हणतात, देव पहाता येतो.देव पहाण्यासाठीही अवयव हेच माध्यम आहे. पण आपण सहजतेने देव नाही म्हणणारी व्यक्ती पहातो.आपण ज्ञानेश्वरी वाचक असाल तर अठरा अध्यायात आपण काय वाचलं?असा प्रश्न विचारला तर हे निश्चित आहे की फार काही आणि नेमकं सांगता येणार नाही.
मोहोळामधुन मध सहज मिळते.कारण मधमाश्यांनी मोठ्या कष्टाने ते पोळ्यात साठवलेलेच असते.पण मध न साठलेलंच मोहोळ तुम्ही काढलं तर त्यात मध कसं असेल.शिवाय घेतलेले कष्ट वाया गेल्याचं दुःख…ते वेगळच.ज्ञानेश्वरी हे ब्रम्हज्ञानरुपी मधाने भरलेलं पोळं आहे. मध मिळणारच.पण ज्ञानेश्वरी वाचुन सर्व प्राप्त होण्याइतपत ते सहज नाही.
शालेय पाठ्यपुस्तकातलं कळण्यासाठी गुरुची आवश्यकता असते,हे तर ब्रम्हज्ञान आहे. हे नुसत्या वाचनाने कळेल?त्यासाठी सदगुरुंचं मार्गदर्शन हाच तो मुळ पाया आहे.आपण द्वैतात असाल तर हे लेख आपल्याला खूप काही देऊ शकतील. यापुढे नियमित वाचा.
रामकृष्णहरी