Take a fresh look at your lifestyle.

रूपालीताई… तुम्ही जरा सांभाळुन बोलायला हवं होतं !

वैजयंताताई चव्हाण यांनी साधला निशाणा.

 

 

शिरूर : रूपालीताई चाकणकर यांनी थोडं सांभाळून बोलायला हवं होतं. आमचे नेते प्रविण दरेकर यांच्या वाक्याचा वेगळाच अर्थ लावला गेला अन् एकअर्थी त्यांनीच महिलांचा अपमान केला आहे, म्हणून आम्ही समस्त शिरुरकर महीला रूपालीताई चाकणकर यांचा निषेध करतो, अशा शब्दात शिरूर भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा वैजयंताताई चव्हाण यांनी रूपालीताई चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.

त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. त्याचा शब्दशः अर्थ असा की काजू बदाम आणि सुकामेवा खावून-खावून तुमच्या कारखानदार नेत्यांचे, सुभेदारांचे, बॅकवाल्यांचे गाल कसे रंगलेत आणि त्यांनाच राष्ट्रवादी कसा जवळ करतो, अशा अर्थाने दरेकर बोलले होते. त्यांचे वक्तव्य चांगलेच झोंबल्याने चाकणकरांनी दरेकरांचे वक्तव्य थेट महिलांशी जोडून चाकणकरताईंनी समस्त महिलांचा घोर अपमान केला आहे.

दरेकरांच्या भाषणात कुठलाही महिलांचा उल्लेख नसताना चाकणकरांनी जो पोरकटपणा दाखवून दरेकरांचे वक्तव्य महिलांशी जोडले याबद्दल चाकणकरताईंनी आता संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी. दरेकर यांचा कार्यक्रम हा शिरुरमध्ये झाला होता. त्यामुळे आम्ही संपूर्ण शिरुरकर महिला आता चाकणकरताईंचा जाहिर निषेध करतो असे म्हणत वैजयंताई चव्हाण यांनी रुपाली चाकणकरांना दरेकरांचे वक्तव्य पुन्हा पाहण्यासही सांगितले.