पारनेर :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्षपदी पारनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ.पाकीजा अजीम शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
सौ.पाकीजा अजीम शेख या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्या असून त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांचा जनसंपर्क वाढवून अनेक महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले आहे. आमदार निलेश लंके यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पारनेर शहरामध्ये निवडणुकीची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. मागील तीन वर्षाच्या त्यांच्या कार्याची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
पाकीजा शेख यांच्या निवडीचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हा निरीक्षक वर्षाताई शिवाळे, जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच राहुल झावरे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, महिला तालुकाध्यक्षा सुवर्णाताई धाडगे, युवती तालुकाध्यक्षा पुनमताई मुंगसे, नवनिर्वाचित नगरसेवक विजय औटी, सुरेखा भालेकर, डॉ. विद्या कावरे, हिमानी नगरे, मयुरी औटी, योगेश मते,उमाताई बोरुडे,सीमा आवारी, वैजयंता मते, श्रीकांत चौरे,संदीप चौधरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.