Take a fresh look at your lifestyle.

बनावट सॉफ्टवेअरपासून तुमचं बँक खातं सुरक्षित कसं ठेवायचं? 

फसवणुक टाळण्यासाठी नक्की वाचा!

तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाले खरे मात्र फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार विविध पद्धतींद्वारे बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात. 
त्यापैकी एक मार्ग म्हणजे मालवेअर. हा मुख्यतः तुमच्या सिस्टमशी छेडछाड करतो. तो तुमच्या परवानगीशिवाय तुमची सर्व माहिती अ‍ॅक्सेस करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. दरम्यान गुन्हेगारांना मालवेअरद्वारे माहिती कळताच ते ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर करतात. दरम्यान असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे याप्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता. चला, आज त्याबाबत जाणून घेऊया…
असे राहा बनावट सॉफ्टवेअरपासून सुरक्षित :
● कॉम्पुटर किंवा मोबाईलवर कधीही अनधिकृत किंवा परवाना नसलेले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका.
● तुमच्या संगणकावर कोणत्याही अविश्वसनीय फाइल्स ठेवू नका.
● सिस्टम अँटी-व्हायरस आणि स्पायवेअर डिटेक्शनला नियमितपणे अपडेट करा.
● कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यापूर्वी, तुम्ही काय इन्स्टॉल करत आहात? हे तपासा.
● कोणत्याही वेबसाइट किंवा सोशल वेबसाइटवर पॉप-विंडोमध्ये तुमचा पासवर्ड, कार्ड डिटेल्स आणि कोड टाकू नका. अशाने फसवणूक होऊ शकते.