Take a fresh look at your lifestyle.

आता गुगलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी…!

लवकरच पुण्यात सुरू होणार ऑफिस.

सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. कारण कंपनीने भारतात आपले नवे कार्यालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. हे कार्यालय आपल्या महाराष्ट्रातील पुण्यात सुरू होणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात हे ऑफिस सुरू होऊ शकते. सध्या यासाठी गुगलकडून भरती प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती गुरुग्राम, हैदराबाद, बंगळुरूमध्ये करण्यात येत आहे.
भारतातील गुगल क्लाऊड इंजिनियरिंगचे व्हॉईस प्रेसिडेंट अनिल भंसाली यांनी माहिती देताना सांगितले की, गुगल क्लाऊडसाठी आवश्यक टॅलेंट पूल भारतामध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे भारत गुगलसाठी चांगले ठिकाण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीने भारतातील टॉप इंजिनियरिंग टॅलेंटला आगामी डेव्हलपमेंट सेंटरसाठी हायर केले आहे.
पुढे बोलताना भंसाली म्हणाले की, एक आयटी हब म्हणून पुण्यामध्ये विस्तार करून उत्तम प्रतिभावंतांना सोबत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. हे ऑफिस ग्राहकांसाठी अद्ययावत क्लाऊड कम्प्युटिंग समाधान, उत्पादन आणि सेवा देण्यासाठी गुगलकडून सुरू केलं जातंय. पुण्याचे हे ऑफिस अद्ययावत इंटरप्राईज क्लाऊडच्या तंत्राची निर्मिती, रियल टाईम तांत्रिक सल्ला आणि उत्पादन आणि कार्यान्वयन तज्ज्ञता प्रदान करणार आहे.