Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील तिघांना ‘पोलीस पदक’ जाहीर !

केंद्रीय गृह मंत्रालयाने केली घोषणा.

अहमदनगर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील तिघांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत चितांमण नागरे यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), अहमदनगर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ तिजोरे व अल्ताफ मोहिउद्दीन शेख यांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.
पोलीस पदकाची नुकतीच घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ५१ पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील तिघांचा यामध्ये समावेश आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तिजोरे यांनी ३३ वर्षे सेवा केली आहे. राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) दरोडा प्रकरणाविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. याचे उत्तरे तिजोरे यांनी व्यवस्थीत पाठविली. त्यांनी लाचलुचपत विभागात काम करताना अनेक केसेस हाताळल्या. खर्डा (ता. जामखेड) हत्याकांड प्रकरणात वरिष्ठांना वेळेवर अहवाल सादर करण्याबरोबरच अहमदनगर शहरातील मोहरम, गणपती बंदोबस्ताच्या नियोजनात तिजोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी प्रकाश कांडेकर खून प्रकरणी आरोपी पकडणे, तपासात मदत करणे, सराईत गुन्हेगार पाप्या शेख याच्यावरील मोक्का प्रस्ताव तयार करणे, पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात १२ टोळ्यातील ६२ गुन्हेगार हद्दपार करण्यास मदत करणे याशिवाय गावठी कट्टे, काडतुसे, आरोपी अटक, मुद्देमाल हस्तगत करणे आदी प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे हे पोलिस मदत केंद्र, कोटमे, ता. येतापल्ली, जि. गडचिरोली. येथे प्रभारी अधिकारी असताना वरीष्ठाची परवानगीने त्यांनी २५ मार्च २०१८ रोजी नक्षली अभियान राबविले. यावेळी नक्षलीसोबत चकमक झाली. नक्षल्यांनी जोरदार फायरींग केली.
ऑपरेशनदरम्यान नागरे यांच्या टिमने नक्षलवाद्यानी लावलेले पाच क्लेमर बॉम्ब डिसपॉज केले. एक महिला नक्षलवाद्याची डेडबॉडी हस्तगत केली. या अभियानादरम्यान ब्लास्टिंगचे साहित्य, जिवंत क्लेमर बॉम्ब, थ्री बाय थ्री वेपन आदीसह मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला होता. विषेश म्हणजे या ऑपरेशनदरम्यान पोलिस पथकातील एकही कर्मचारी जखमी झाला नव्हता. या कामगिरीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे नक्षल्यासोबत झालेल्या चकमकीत नागरे यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले असून त्यांचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून अभिनंदन होत आहे.