Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर का झटका !

"या" नगरसेवकांचा उद्या होणार पक्षप्रवेश.

मालेगाव : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मालेगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार रशीद शेख यांच्यासह महापौर ताहेरा शेख आणि २७ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या (गुरुवारी) हे सर्वजण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मालेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला आता मित्रपक्षानेच सुरुंग लावला आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसला खिंडार पडलं आहे असेच म्हणावे लागेल.

माजी आमदार आसिफ शेख यांनी याआधी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख तसेच आई महापौर ताहेरा शेख हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. शेख कुटुंबीय हे काँग्रेसचे निष्ठावंत कुटुंब मानले जात होते. मात्र या कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला चांगले यश आले आहे.