Take a fresh look at your lifestyle.

सरोगसी म्हणजे नक्की काय असतं? 

सविस्तर जाणून घ्या...

बॉलिवूडमधील अनेक स्टार सरोगसीच्या मदतीने पालक बनले आहेत. केवळ सेलिब्रिटिच नव्हे, तर अनेक सर्वसामान्य लोकांसाठी सरोगसी वरदान ठरले आहे. कारण ज्या जोडप्याला मुलं होण्यासाठी अडचण असते, ते जोडपं देखील यापद्धतींचा वापर करुन आपल्या मुलाला या जगात अनु शकते. मात्रबऱ्याच लोकांना सरोगसी म्हणजे काय आणि भारतात त्याचे काय नियम आहेत? याबाबत पुरेशी माहिती नसते. चला, तर आज त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…   
सरोगसी म्हणजे नक्की काय? : एखादं जोडपं आपलं मूल जन्माला घालण्यासाठी दुसऱ्या महिलेचा गर्भ भाड्याने घेते. तेव्हा या प्रक्रियेला सरोगसी असे म्हणतात. यामध्ये स्त्री तिच्या किंवा दात्याच्या अंड्यांद्वारे दुसऱ्या जोडप्यासाठी गर्भवती होते.

सरोगसीद्वारे मूल होण्यामागे अनेक कारणे आहेत. जसे की, जोडप्याला वैद्यकीय-संबंधित असेल तर, गर्भधारणेमुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल तर किंवा स्त्रीला आपल्याला मूल होऊ नये असे वाटत असेल तर. असे सर्व लोकं दुसऱ्या स्त्रीचा गर्भ भाड्याने घेऊ शकतात. दुसऱ्याचे मूल आपल्या पोटात वाढवणाऱ्या स्त्रीला सरोगेट मदर असे म्हणतात.
दरम्यान मूल होऊ इच्छिणारे जोडपे आणि सरोगेट आई यांच्यात एक करार केला जातो. याअंतर्गत, गर्भधारणेतून जन्मलेल्या मुलाचे कायदेशीर पालक सरोगसी करणारी जोडपी असतात. सरोगेट आईला गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय गरजांसाठी पैसे दिले जात असतात.

सरोगसीचे दोन प्रकार : पारंपारिक सरोगसीमध्ये वडिलांचे किंवा दात्याचे शुक्राणू सरोगेट आईच्या अंड्यांशी जुळतात. यामध्ये सरोगेट मदर ही बायोलॉजिकल मदर (जैविक मदर) असते.
दुसरी पद्धत अशी असते, ज्यामध्ये सरोगेट आईचा मुलाशी अनुवांशिक संबंध नाही. म्हणजेच सरोगेट मदरची अंडी गरोदरपणात वापरली जात नाही. यामध्ये सरोगेट मदर ही मुलाची जैविक आई नसते. ती फक्त मुलाला जन्म देते. यामध्ये वडिलांचे शुक्राणू आणि आईची अंडी एकत्र करून किंवा दात्याचे शुक्राणू आणि अंडी यांची टेस्ट ट्यूब मिळाल्यानंतर ते सरोगेट आईच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते असतात.

भारतातील सरोगसीचे नियम नक्की काय आहेत? : भारतात 2019 मध्येच व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरोगसीचा पर्याय केवळ मदतीसाठी खुला आहे. तसेच नवीन विधेयकाने परोपकारी सरोगसीबाबतचे नियम आणि कायदेही कडक केले आहेत.
याअंतर्गत, परदेशी, सिंगल पालक, घटस्फोटित जोडपे, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी सरोगसीचे मार्ग बंद आहेत. सरोगसीसाठी, सरोगेट आईकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र आवश्यक आहे.सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांकडे वंध्यत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे. तथापि, सरोगसी नियमन विधेयक 2020 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये कोणत्याही ‘इच्छुक’ महिलेला सरोगेट बनण्याची परवानगी होती.