Take a fresh look at your lifestyle.

त्याने गर्लफ्रेंडसाठी बनवलेले ‘असे’ नियम !

जाणून तुम्हाला बसेल धक्का...!

जोडप्यात वाद होणे काही नवीन गोष्ट नाही. मात्र जेव्हा कोणतीही व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुसऱ्या व्यक्तीवरती हक्क सांगू लागते. ती गोष्ट मात्र खटकण्यासारखी आहे. अशीच एक अजब घटना समोर आली आहे.

एका मुलीच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी बनवलेले नियम ऐकून कोणालाही संताप येईल हे नक्की. या बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडचे खाणे, पिणे, प्रवास करणे आणि विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करणे यावर निर्बंध लादले आहेत. या मुलीने सोशल मीडियावर या नियमांचा स्क्रीनशॉट शेअर केला. जो अल्पावधीत 27 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.

मुलीने यादी शेअर केलेली यादी अशी… :

● दारूला स्पर्शही करणार नाही.

● स्नॅपचॅट लोकेशन बंद करणार नाही.

● मुलांसोबत हँग आउट करणार नाही.

● बॉयफ्रेंडने दिलेली अंगठी कधीही काढणार नाही.

● दररोज रात्री 9 वाजेपर्यंत वसतीगृहात परत येईल.

● क्रॉप टॉप आणि घट्ट ड्रेस घालणार नाही.

● बॉयफ्रेडंला पार्टीला उपस्थित राहण्यास मनाई करणार नाही.

पुढे ती मुलगी म्हणाली, “मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, हे वर्तन अपमानजनक आहे. हे एखाद्याला भावनिकरित्या दाबून ठेवण्यासारखे आहे. लोकांनी मुलीच्या बॉयफ्रेंडच्या वागणूकीचा निषेध केला असून सहानुभूती व्यक्त केली आहे.