Take a fresh look at your lifestyle.

जगण्यात सहजता आली की आनंद वाढतो !

जगण्यातला सहज सात्विकभाव म्हणजे ईश्वर.

आपण जगताना जेवढे बेगडी वागणार तेवढे कष्ट वाढतात.आहे तसं जगणं स्वतःला पटत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. इर्षा बरच काही करुन घेते.सुडभावना इथच जन्माला येते.मनुष्यातला ईश्वर जागा करण्याच्या क्रियेतला मुख्य भाग म्हणजे क्षमाशीलता.
क्षमा मागणं हे असाधरण कर्म आहे. चुक झालेली उमगली की मग विनाविलंब क्षमा मागता येण्यासाठी मोठी तपसाधना आहे. ही तपसाधना प्रापंचिकाला अत्यंत गरजेची आहे.
 इर्षा तुम्हाला वेगाने आधीव्याधीकडे घेऊन जाते.शुन्यावस्था प्राप्त करता येणं हल्लीच्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी गरजेचं आहे. पण ती प्राप्त करता येत नाही. अनेकांना ती प्राप्तही करता आली असेल.मुख्य आव्हान ती टिकवता येणं ही आहे. झोपेतून उठण्यापासुन ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्व बदलावं लागेल.सुर्य उगवल्यानंतर उठणाऱ्या मनुष्याला आजार लवकर घेरतात.विचारांमधे शालिनता रहात नाही. शारीरिक कटकटी सुरू झाल्या की मग शुद्ध सात्विक विचार तयार होत नाही. आधीपासूनच “सदविचारदर्शन असेल तर विकारही त्रास देत नाहीत.”हे अंडरलाईन करण्यासारखे वाक्य आहे.
सात्विक विचार या मागचं खरं रहस्य आहे.प्रत्येक मनुष्य विचारातच बुडालेला आहे. पण नव्वद टक्के विचार नकारात्मक आहेत. कुणाचही अहीत चिंतायचं नाही हे ठरवता येणे खूप कठीण आहे. पण हा जन्म पुन्हा मिळेल की नाही याची खात्री नाही. मग इवल्याश्या आयुष्यात काय काय करावं?निम्म आयुष्य झोपेत जातं आणि उरलेले कमावण्यात.आयुष्यातला किमान पंचवीस टक्के भाग तरी आनंदाने व्यतीत करता यावा.यासाठी तारुण्यातच तशी घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण उशिरा सुचलेलं शहाणपण प्रत्येक वेळी कामालाच येते असं नाही. वय झाल्यानंतर हे सुचलं तर आधीचं पुसणं शक्य होत नाही. आपला पुर्वायुष्याचा ठसा चांगला नसेल आणि नाही हे कळालं तो क्षण शहाणपणाचा.पण सुधारण्यासाठी आयुष्य शिल्लक असलं तर आणि तरच जमेल.त्यासाठी जगण्यात सहजता यायला हवी आहे.तसं….मग दुःखाचा लवलेशही होत नाही. स्पर्धा होत नाही. जे मिळालय त्याची अहंता नाही आणि जे मिळालं नाही त्याचा हव्यास नाही.
आपल्यातही एक सहज भाव आहे तो आपल्या जगण्यावागण्यातुन बाहेर पडत असतो.त्याला स्वभाव म्हणता येईल. वरुन कितीही सजलो तरी तो आंतरिक सहजभाव बाहेर येतोच.तुकोबाराय म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी।आत जे आहे ते आपोआप बाहेर प्रगट होते.म्हणजे आतुनच बदलता आले पाहिजे. जे बाहेर येईल ते शुद्ध सात्विक असले की मग आनंदाचा धनी होता येईल.
रामकृष्णहरी