Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील ‘या’ बडया नेत्यालाही कोरोनाची बाधा !

डॉक्टरांच्या निगराणीत घरीच उपचार सुरु.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याची माहिती खा.शरद पवार यांनी दिली आहे.
तसेच गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन खा.पवारांनी केले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसामंध्ये अनेक राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. आता शरद पवार यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. या दरम्यान त्यांना ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत काळजी करण्याचे कारण नाही असे सांगितले आहे.
खा.शरद पवार हे गेले दोन दिवस बारामती आणि पुणे दौऱ्यावर होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा ती पॉझिटिव्ह आली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, शरद पवार यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पवार यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एक कार्यक्रम नियोजित आहे. मात्र, आता त्यांना पवारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आजोबा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या ट्वीटने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’