Take a fresh look at your lifestyle.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह : तरीही आंदोलन सुरूच !

'महावितरण'च्या अन्यायाविरोधात शिरूरमध्ये सत्यागृह.

शिरूर : विविध मागण्यांसाठी महावितरणच्या विरोधात कार्यकर्त्यांसह शिरूर येथे आंदोलनास बसलेले संजय पाचंगे यांची कोरोना चाचणी रविवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने मी तात्पुरता आंदोलनातून बाजूला होत असून माझे कार्यकर्ते हे आंदोलन पुढे चालू ठेवतील, असे श्री पाचंगे यांनी म्हटले आहे.
श्री. पाचंगे यांनी रविवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महावितरणने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे विज कनेक्शन कट करण्याची कारवाई थांबवावी व शेतकऱ्यांना विज पोल, ट्रान्सफॉर्मर, हाय टेंशन पोल बसवलेचे भाडे, नुकसान भरपाई देणेसाठी व महावितरणच्या अन्यायाविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
परंतू गेले दोन दिवस खुपच ताप, घसा दुखणे अशक्तपणा, चा त्रास होत होता. शिरुर पोलीस स्टेशनच्या पत्रावरून शिरुर ग्रामीण रुग्णालयात कोविड चाचणी केली त्यात माझा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे.
त्यामुळे मला कमीत कमी ७ दिवस होम क्वारंटाईन व उपचार घेणे आवश्यक आहे.
परंतू हे आंदोलन त्यामुळे थांबणार नसून शिरुर शहर भाजपाने उपोषणाऐवजी मी पुन्हा आंदोलनात परत जात नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सन्माननीय भाजपा जिल्हा अध्यक्ष व तालुका सरचिटणीस यांनी ही यास मान्यता दिली आहे.
शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे अर्ज भरले आहेत. ज्यांनी अजुन भरले नसतील त्यांनी भरुन घ्यावेत. तसेच आंदोलनासाठी प्रत्येकाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ उपस्थिती दाखवावी ही कळकळीची नम्र विनंती.