Take a fresh look at your lifestyle.

नवऱ्यासमोर ‘या’ गोष्टी टाळा; अन्यथा नात्यावर होईल वाईट परिणाम!

विविध कारणाने नवरा-बायकोमध्ये भांडणे होतच असतात. त्यात तसं फारसं नवीन काही नाही. मात्र थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याची काळजी घेतली तर नवरा-बायकोमधील भांडणे नक्कीच कमी होऊ शकतात…
● माहेरची स्तुती : अनेकदा तुमच्या माहेरची तुलना तुमच्या सासरच्या लोकांशी करता. परंतु या गोष्टीमुळे तुमच्या नवऱ्याला राग येऊ शकतो. ही स्तूती करणं थांबवल्याने तुम्हाला हे वाद टाळता येऊ शकतात.
● नुसती तक्रार : बायकोला सासू-सासऱ्यांशी काही तक्रार असेल, तर तिने त्यांच्यासोबत बसून सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. सातत्याने बायको आपल्या आपल्या आईवडिलांची तक्रार करत असेल तर नवऱ्याला त्याने वाईट वाटू शकते.
● कुटुंबाची तक्रार : तुमच्या नवऱ्याला त्याच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीची तक्रार करु नका. असे केले तर तुमच्या नवऱ्याला याचा त्रास होऊ शकतो.
● दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना : बायकोने कधीही तिच्या नवऱ्याची तुलना शेजारच्या इतर पुरुषांशी करू नये. हे करत असताना, तुम्ही तुमच्या नवऱ्याचा अपमान करू शकता, जे नवऱ्याला अजिबात आवडणार नाही.
● महाग वस्तूंची मागणी : पतीकडून महागड्या गोष्टींच्या मागण्या करण्यापूर्वी आधी त्याची आर्थिक स्थिती आणि घराची स्थिती धनात घ्या. प्रतिकूल परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या पतीकडून महागड्या मागण्या करता, तर हे पाऊल तुमचे नाते कमकुवत करू शकते.