Take a fresh look at your lifestyle.

लतादिदींच्या प्रकृतीबाबत डॉक्टर तर म्हणतात..

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर प्रकृती कारणास्तव अजूनही आयसीयू वॉर्डमध्येच उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 9 जानेवारीपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना आणि न्यूमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातील त्यांचे असंख्य चाहते देवाकडे प्रार्थना करीत आहेत.
त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी म्हणाले, ‘लता मंगेशकर औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्या लवकर बऱ्या होण्याची चिन्हे दिसत आहेत.मात्र त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल याबाबत आताच काही सांगता येणार नाही.’असेही डॉ.समदानी यांनी सांगितले.