Take a fresh look at your lifestyle.

टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट आ.लंकेकडून ” टार्गेट” !

पारनेर :निलेश लंके ध्येयवेडा माणूस असून जे ठरवतो ते करतोच त्यामुळे आगामी लक्ष्य हे केवळ टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट असणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट ताब्यात दिल्यास उर्वरीत विकास कामांचा अनुशेष भरून काढणार असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे २ कोटी ७६ लाख रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आ.लंके यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, अशोक कटारिया,गंगाराम बेलकर,जितेंद्र सरडे,भागुजी झावरे,नगरसेवक विजय औटी,नगरसेविक सुरेखा भालेकर,नगरसेवक नितीन अडसूळ,नगरसेविका डॉ. विद्या कावरे,नगरसेवक योगेश मते,नगरसेवक प्रियंका औटी, नगरसेविक हिमानी नगरे,नगरसेवक भुषण शेलार,सरपंच अरूणा खिलारी,किरण तराळ,सुनिता झावरे,दत्ता निवडुंगे, गंगाधर निवडुंगे,शुभम गोरडे,बापू शिर्के श्रीकांत चौरे ,राजेंद्र चौधरी,भाऊसाहेब भोगाडे,प्रशांत तराळ,संदिप चौधरी,बाळासाहेब खिलारी,युवराज खिलारी अंकुश पायमोडे,भाऊसाहेब झावरे सर ,दामोदर झावरे,भाऊ चौरे,रवी गायके संपत तराळ,अशोक पायमोडे,महेश झावरे,संदिप पायमोडे,श्री ढोकेश्वर फौंडेशनचे संजय खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ.निलेश लंके म्हणाले की,विकास कामांची मागणी करणे जनतेचे काम आहे मात्र मागणी पुर्ण करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.
येणा-या काळात पंचायत समिती व जिल्हा परिषद टार्गेट असून सहकार्य करण्याचे आवाहन केले.टाकळी ढोकेश्वर हे ३५ ते ४० गावांची मोठी बाजारपेठ असून मंजूर झालेले टाकळी ढोकेश्वरचे पोलिस स्टेशनचा लोकार्पण सोहळा दोन महिन्यात मार्गी लागणार असल्याचेही आ. लंके यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वर जि.प.गटातील सदस्य निवडून द्या एकही विकास काम मागे राहणार नाहीत.

कामाला महत्व देणारा माणूस आहे.गुरू पेक्षा शिष्य दोन पावल पुढे असतो. आपण ध्येयवेडा माणूस असून तालुक्यातील विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचे ध्येय आहेत.कोव्हिड काळात भाऊ भावाला विसरला त्याला आधार देण्याचे काम केले.यावेळी अशोक कटारिया,अर्जुन भालेकर,गंगाराम बेलकर,नितीन अडसूळ,बाळासाहेब खिलारी यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रम झावरे यांनी तर आभार बाळासाहेब खिलारी यांनी मानले.
पारनेर तालुक्यातील चौफुल्यावर वसलेले ३५ ते ४० गावांची मुख्य बाजारपेठ टाकळी ढोकेश्वर गटात आदीवासीं जनतेची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भविष्यकाळात सुख सुविधा युक्त असे ग्रामिण रूग्णालय उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.