Take a fresh look at your lifestyle.

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न निकाली न निघाल्याने लाक्षणिक उपोषण करणार ! 

शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांची माहिती !

 

 

पारनेर : राज्यस्तरावर ५० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने विद्यार्थी गुणवत्तेवर परिणाम जाणवत आहे.रिक्त असणारी केंद्रप्रमुख पदे तातडीने सेवाजेष्ठतेने भरावीत

केंद्रप्रमुख पदे ५० टक्के सेवाजेष्ठतेने व ५० टक्के कार्यरत शिक्षकांमधून परीक्षेद्वारे भरण्यात यावीत यासह अन्य मागण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षक परिषद आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑक्टोबर रोजी पुणे येथे शिक्षण आयुक्तालय येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना ठुबे म्हणाले,या मागण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण विभाग,शिक्षक आयुक्त व शिक्षण संचालकांकडे सातत्याने पत्रव्यवहार,प्रत्यक्ष भेटी, बैठका घेऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उपस्थिती भत्ता १ रुपयाऐवजी वाढ करुन १० रुपये करावी,शिक्षकांचे दरमहा वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्यात यावे,दरमहाचे वेतन राज्यातील अनेक जिल्हा परिषदांकडून दोन महीने उशिरा होते,त्यामुळे शिक्षकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

हे महत्वाचे प्रलंबित प्रश्न आहेत.

लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या बरोबर राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले,उपाध्यक्ष संजय शेळके,नाशिक विभागीय अध्यक्ष राजू जायभाये उपस्थित राहणार आहेत.