Take a fresh look at your lifestyle.

मानसिक अपचन हे सर्वात धोकादायक !

युवकांनो खास तुमच्यासाठीच...

खाल्लेलं पचलं नाही की अपचन होणारच.हा तर आपल्याकडे सर्रास होणारा आजार.
पण बरेचदा आपण काय खाल्ल्याने अपचन होतं हे कळत नाही. शोधायला बराच काळ जातो. पण तोपर्यंत शारीरिक हानी खूप झालेली असते.
पण अपचनाशी संबंधित असलेली अन्नपदार्थांचे व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे !
आणि ती म्हणजे मानसिक आरोग्य !
कायीक,वाचिक आणि मानसिक आरोग्य राखता आलं तर त्याला श्रेष्ठ पुरुषार्थ म्हटलं आहे.
आपण कायीक म्हणजे शारीरिक आरोग्य राखण्यासाठी प्रयत्नशील असतोच. म्हणजे अमुक खाल्ल्याने तमुक फायदा होतो.अशी फेसबुक पोस्ट जरी वाचनात आली तरी फॉरवर्ड ते स्वतः अंमलबजावणी करण्यात आपण धन्यता मानतोच.
वाचिक आरोग्य राखणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.
वाचिक म्हणजे तोंडाने होणारे बोलणे.आपण काय बोलावं हे न कळणारे मोजताच येणार नाहीत.
केवळ गरज नसताना तोंडाळपणा केल्याने अनेक व्यक्ती संकटात आलेल्या आपण पहातो.मग माफी मागण्याची वेळ येते. पण त्यातून स्वभाव दर्शन होऊन नको तो त्रास प्राप्त होतोच.
म्हणून संतांचा उपदेश आहे की “बोला तर हरी बोला…”
मानसिक आरोग्य म्हणजे मनाची स्थिती शुद्ध राखणे.आपल्या सर्व कर्मात प्रधान असते ती मानसिकता.ही मानसिकता तयार होते ती कौटुंबिक विचारांवर आणि ज्या परिसरात आपण रहातो तिथल्या समाजावर,मित्रांसोबत्यांवर.
मन पवित्र आणि शुद्ध ठेवण्यासाठी मानवमात्राला वेगवेगळे नियम नाही.
▪️भंगार मानसिकतेची काही लक्षणे
 दुसऱ्याचं वाटोळं व्हावं आणि माझं चांगलं व्हावं ही वृत्ती.
दुसरा अडचणीत आल्याने आनंद होणे.एखाद्याच्या मृत्युने आनंद होणे,स्वार्थी मैत्री,सोबत राहुन सोबत्याचे अहित करणे,संबंध नसताना एखाद्याची भौतिक प्रगती पाहून दुःख होणे,
परस्री लोभ,कष्ट न करता धन मिळवण्याची इच्छा.
यापैकी कोणतही लक्षण आपल्याला लागु पडत असेल तर अपचन या विकारापासुन आपणास जगातला कोणताही डॉक्टर वाचवु शकत नाही.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मन प्रसन्न असणे अनिवार्य आहे. शिळ्या भाकरी खाऊनही निरोगी रहाता येतं.त्यासाठी बदामपिस्त्याची आवश्यकता नाही.
युवकांनो मन प्रसन्न ठेवण्यासाठी आईवडीलांना सन्मान द्या.सतत दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे रहा.दुसऱ्याचं भलं व्हावं हा गुण जर तुम्हाला आत्मसात करता आला तर तुम्ही स्वतःच देवच आहात याचा आत्मबोध होईल.
मग न पचणारे विचार तुम्ही स्विकारणार नाहीत.
अपचन होणं थांबेल.
चला आपण सारेच अपचण होणार नाही याची दक्षता घेऊ.
जय जय राम कृष्ण हरी