Take a fresh look at your lifestyle.

पारनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू !

१२ विद्यार्थ्यांची झाली निवड.

 

 

पारनेर : महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात विविध आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे नुकतेच आयोजन करण्‍यात आले होते.यावे कॅम्पसमध्ये महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ज्युबिलंट फार्मासिटिकल लिमिटेड दिल्ली, आर्गन लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर, बद्रीविशाल केमिकल अँड फार्मास्युटीकल लिमिटे पुणे, व नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड सुरत या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. कॅम्पसचे आयोजन ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतींमध्ये महाविद्यालयात करण्यात आले. विभागातील एम.एस्सी. अॅनालिटीकल व ऑरगॅनिक या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची प्रथम गुणवत्ता चाचणी व त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेण्यात आले.

कु.म्हस्के राणी, आहेर प्रदिप, बाबर मंगेश यांची आर्गन लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर, रावडे दिगंबर, ठुबे अक्षय यांची बद्रीविशाल केमिकल अँड फार्मास्युटीकल लिमिटे पुणे , कु. थोरात प्रतिक्षा हिची ज्युबिलंट फार्मासिटिकल लिमिटेड दिल्ली व कु. सोंडकर शुभांगी, कु. नवले सुषमा, कु. शेळके धनश्री, शिंदे पवन, तावरे सून, घुले सौरभ यांची नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड सुरत येथे निवड झाली.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्‍यक्ष नंदकुमार झावरे पाटील,उपाध्यक्ष रामचंद्र दरे , सचिव.जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ मुकेश मुळे , कार्यकारणी सदस्य राहुल झावरे यांनी अभिनंदन केले.

महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. आर. के. आहेर, उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ. डी. आर. ठुबे यांचे मार्गदर्शन लाभले व रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर घेतले त्याच्या फायदा मुलाखतीसाठी झाल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. तसेच दि. २१ सप्टेबर २०२१ रोजी अरबिंदो फार्मा, हैद्राबाद या कंपनीच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा. सागर म्हस्के यांनी सांगितले.