Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून तुमचे केस पांढरे होत आहेत!

जाणून घेऊयात त्यामागची कारणं !

हल्ली अनेकांना केसांच्या समस्या सतावत आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे केस पांढरे होणे. मात्र असे का होत आहे? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नसेल तर आज त्यामागची कारणे जाणून घेऊयात… 
● तुमच्या कुटुंबातील कुणाचे केस अवेळी पांढरे झाले असतील, तर तुमचे केस देखील अवेळी पांढरे होऊ शकतात.
● केसांना वारंवार डाय केल्याने केस आणखी पांढरे होण्याची शक्यता असते.
● अवेळी झोपणे किंवा झोपं पूर्ण न घेणे ह्याने देखील केस पांढरे होऊ शकतात.
● केसांना चमकदार बनविण्यासाठी अनेक एक्सपिरिमेंट केले जातात. यात केमिकलचा वापर जास्त असेल तर याने केस पांढरे होतात.
● जेव्हा मेलॅनिन स्वतः नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवते तेव्हा केस हे पांढरे व्हायला सुरुवात होते.
● केसांना काळे ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 महत्वाचे आहे. मात्र याच्या कमतरतेमुळे मेलॅनिन नवीन पेशींची निर्मिती करू शकत नाही.
● ज्या लोकांना डोकेदुखीचा किंवा सायनस हा आजार असतो. त्या लोकांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होतात.
● जर तुम्ही विविध प्रकारचे व्यसन (मद्यपान, धुम्रपान, ड्रग्स इत्यादी गोष्टी) करत असाल, तर हे देखील तुमचे केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत आहे.
● शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही. यामुळे देखील केस पांढरे होऊ शकतात.