पारनेर : तुम्ही कृषी क्षेत्रात करीयर करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही नामी संधी आहे. दहावी किंवा बारावीनंतर अॅग्री डिप्लोमाचा हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होवू शकतात.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित कृषी तंत्र विद्यालय वाळुंज (ता.नगर) येथे कृषी क्षेत्रात करीयर करण्याची संधी आहे.संपुर्ण मराठी माध्यमातला हा कोर्स दोन वर्षांचा आहे.
या कोर्सनंतर कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था,पाटबंधारे, कृषी विज्ञान केंद्र,कृषी आधारीत कंपनी,कृषी आधारीत स्वयं उद्योग, माती परीक्षण केंद्र,वन विभाग, कृषी सेवा केंद्र परवाना अशा नोकरी व व्यावसायाच्या संधी उपलब्ध होवू शकतात.एस सी,एस टी,एन टी व ओबीसीसाठी शासकीय नियमाप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या प्राचार्यांशी (९०२८०५५०३६) संपर्क साधावा.