Take a fresh look at your lifestyle.

देहाचं महत्त्व कळाल्यावर व्यसन शिल्लक राहिलच कसं?

व्यसनाधीनता तरुण पिढीला भिकेला लावणार.

 

 

तुकोबाराय म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा।मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा।। देवांना देखील मनुष्य योनीत जन्म घेण्याचा मोह होतो.पण कशासाठी?मनसोक्त दारु पिण्यासाठी की तंबाखू मळत आयुष्य घालण्यासाठी?बहुतांश जगण्याचा कल तर असाच दिसतोय.समाजात मार्गदर्शन करणारा आणि पिढ्या घडवणारा मुख्य घटक म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते.आता तरुण पिढीला वाचवण्यासाठी त्यांनीच हे मिशन हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

लहान वयातच व्यसनाचे दुष्परिणाम मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. अपयशानं खचुन कित्येकदा हा मार्ग पत्करला जातो किंवा घरातच चंगळवादी वातावरण असेल तर मग विचारायलाच नको.बाप तंबाखू खात असेल तर मुलाने गांजा,चरस ओढला तर वाईट वाटुन घेण्याचं कारणच नाही.बाळाला जन्म देणं म्हणजे प्रपंच या भाबड्या समजुतीतुन बाहेर काढण्यासाठी प्रौढांसाठी मार्गदर्शन व्हायला हवे.नवा जीव जन्माला घालताना काय मानसिकता असली पाहिजे, तो या जगात येऊन काय करणार आहे? याचं भान जन्मदात्याला असलं पाहिजे.

तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी आम्ही मुक्तानंद व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आहे. पहिल्या पायरीवर समुदेशन करण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न विनामूल्य करत आहोत.आपणही पुढे येऊन अशा तरुणांना आमचेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करावा.

सज्जनहो देहाचं महत्त्व यथायोग्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय कळत नाही. या देहाला कसं शुद्ध ठेवायचं याचं आकलन ज्ञानाशिवाय होत नाही. त्यामुळेच उच्चविद्याविभूषित माणसं सुद्धा व्यसनात अडकलेली दिसतात.

मनुष्य देह कशासाठी?

मनुष्य देहात ती संधी आहे जी इतर कोणत्याही देहात नाही.सत्कर्माने देवत्व प्राप्त करण्याची नामी संधी या नरदेहात आहे.तुच्छ मनुष्याला देखील हे शक्य आहे. पण प्रत्येकाला आपली तुच्छता मान्य करता यायला हवी त्याशिवाय आपण कोण आहोत किती मोठे आहोत हे कळणार कसं?

रामकृष्णहरी