Take a fresh look at your lifestyle.

उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून बिल्डरला खंडणीसाठी धमकावले !

पोलिसांनी सहा जणांनी केली अटक.

पुणे : वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या घटना आपण नेहमीच पहात असतो. मात्र चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाला फोन करत त्याच्याकडे 20 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.  
वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने ही कारवाई केली. त्यासोबतच वाडेबोलाइ येथील जागेचा वाद सोडविण्यासाठी धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादंवि 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता.
सदर आरोपी ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून बिल्डरला फोन करायचे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय असे सांगण्यात आले.
नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अटकेत असलेल्या आरोपींनी संगणमत करून गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यवसायिक आला फोन केला. आणि अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय असं सांगून वीस लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच वाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आहे.