Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून दोन मास्क घालाच !

अन्यथा वाढेल संक्रमणाचा धोका!  

ओमायक्रॉनपासून दूर राहायचे असेल तर, आपल्याला दोन मास्क घालावे लागतील. असे खुलासा हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी केला आहे. कारण दोन मास्क लावल्याने आपण 91 टक्के कोरोनापासून सुरक्षित राहू असे देखील तज्ञांचे म्हणणे आहे.
मायक्रोबायोलॉजिस्ट यूएन क्वोक-युंगच्या म्हणण्यानुसार, ज्यांना अगोदरपासून काही आजार असतील, त्यांनी दोन मास्क घालावेत. सोबतच कोरोनाची लस न घेतलेले, डॉक्टर्स आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी देखील डबल मास्क परिधान करावे. मास्क लावल्याने तोंडाच्या दोन्ही बाजूंनी काही प्रमाणात मोकळी जागा रिकामी असते, अशात संक्रमणचा धोका अधिक आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणी, कंटेटमेंट झोन, रुग्णालय तसेच गर्दीच्या ठिकाणी दोन मास्क घालाच.
मास्क नक्की किती प्रकारचे असतात? : हे तीन प्रकारचे असतात. एक सर्जिकल मास्क, दुसरा N95 मास्क आणि तिसरा कपड्याचा मास्क. N95 मास्कला कोरोनापासून बचाव होण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. कारण हा मास्क तोंड आणि नाकावर घट्ट बसते. तर सामान्य सर्जिकल मास्क हा 85 टक्के कणांना रोखण्यास मदत करते. तर कपड्याचा मास्क हा 30 ते 60 टक्के सुरक्षित आहे.
नक्की कोणते दोन मास्क सोबत घालावे? : अमेरिकी हेल्थ एजेंसी सेंटर्स फॉर डिसज कंट्रोल अँड प्रीवेंशननुसार, सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरा. कारण कपड्याचे मास्क घातल्यानंतर सर्जिकल मास्क चौहूबाजूंनी झाकल्या जाते. मात्र आपण N95 मास्क वापरत असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोन मास्क घालण्याची गरज नाही.
मास्क वापरण्याची योग्य पद्धत काय?
▪️ मास्कला हात लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.
▪️ मास्क असे घाला की तुमचे नाक, तोंड पुर्णपणे झाकल गेले पाहिजे.
▪️ एकदा मास्क घातल्यानंतर त्याला पुन्हा-पुन्हा हात लावू नका. हात लावत असाल तर तात्काळ हात धुऊन घ्या.
▪️ मास्कला नेहमी मागच्या बाजूने धरा.
▪️ सिंगल मास्क घालत असाल, तर एकदाच घाला. दुसरा मास्क घालत असाल तर त्याला धुऊन वापरा.
मास्कला कशापद्धतीने डिस्पोज करावे? : केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मास्कला फेकताना त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. फेकण्यापुर्वी यातुकड्यांना 72 तास आधी पेपर बॅगमध्ये ठेवा. त्यामुळे मास्कवाटे संक्रमणाचा धोका कमी होईल.