Take a fresh look at your lifestyle.

अखेर विराट कोहलीनं टी-२० संघाचे कर्णधारपद सोडलं…

कोण होणार नवा कर्णधार ?

 

 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियात एका पोस्टद्वारे आपण टी-२०चे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे.

आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर विराट टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार आहे.

सोशल मीडियावर एक ट्विट करत विराटनं लिहिलं आहे की, हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

असे असले तरी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची भारतीय टी-20 संघाचा कर्णधारपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत ६५ सामन्यांत सर्वाधिक ३८ विजय, १६ सामन्यांत पराभव तर ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत. वनडेत ९५ सामन्यांत ६५ विजय व २७ पराभव, तर टी-२०त ४५ सामन्यांत २७ विजय व १४ पराभव झाले आहेत.

विराटनं ट्विटमध्ये काय म्हटलं? : भारतीय संघाचे प्रतिनिधित्वच आणि नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे.

त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. टी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन. रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला आहे.