Take a fresh look at your lifestyle.

आता व्हॉट्सअ‍ॅपवर तपासा बँक बॅलन्स!

जाणून घ्या अगदी सोपी प्रोसेस...

 

सर्वाधिक वापरलं जाणार इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. कारण व्हॉट्सअ‍ॅपने आत्तापर्यंत अनेक नवे आणि ईपयुक्त फीचर्स युजर्ससाठी आणले आहेत. युजर्सच्या गरजा लक्षात घेता व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या अ‍ॅपमध्ये पेमेंट करण्याचाही पर्याय दिला आहे.

इतर पेमेंट अ‍ॅपप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपनेही भारतात UPI पेमेंटची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आता यूपीआय पेमेंटचा वापर करून तुम्ही पैसे पाठवू किंवा मागवू शकता. तसेच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करू शकता.

जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये UPI पेमेंट सेट केलं नसेल, तर पेमेंट ऑप्शन सेट करून घ्या. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जावून हा पर्याय तुम्ही निवडू शकता.

– त्यासाठी सर्वात आधी उजव्या बाजूलावर असलेल्या तीन लाइनवर क्लिक करा.

– ज्या नंबरवर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट आहे, त्या नंबरवरच तुमचा बँक अकाउंट नंबर रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे.

– यानंतर UPI PIN सेट करा. या PIN द्वारे ट्रान्झेक्शन करता येईल. तसेच अकाउंट बॅलेन्सही चेक करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे असा तपासा अकाउंट बॅलन्स :

– सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप सुरु करा.

– आता पेमेंट पर्यायावर जा.

– त्यानंतर बँक अकाउंट सिलेक्ट करा.

– इथे View Account Balance वर क्लिक करा.

– आता PIN टाकल्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट बॅलेन्स दिसेल.