Take a fresh look at your lifestyle.

धर्म म्हणजे काय?

धर्मशास्र काय आहे?

धर्म म्हणजे धारण करण्या योग्य असलेला जगण्याचा विचार.आणि धार्मिक म्हणजे ते विचार जगणारा मनुष्य. नेमका धर्म कशाला म्हणावं हे कळल्याशिवाय आपण धर्माने वागतो आहोत का,हे कळेल कसं?न कळालेल्या धर्मातुन आलेली धार्मिकता कुणाचं भलं करू शकेल?
धर्माच्या कार्यस्वरुपावरुन अनेक व्याख्या होतील.मग सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? तर तो आहे राष्ट्रधर्म.आपल्या राष्ट्राप्रती अत्युच्च प्रेम असणे आणि त्यासाठी मरणही पत्करण्याची तयारी असणे म्हणजे राष्ट्रधर्म आहे. याच्या खोलोखाल इतर सर्व धर्म व्याख्या येतात.समाजव्यवस्था उत्तम चालण्यासाठी समाजधर्म आहे.
यामधे सर्व जीवांचा स्वतःच्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. सर्व धर्म समभाव स्विकारलेला एकमेव भारत देश आहे.मग ते सर्व धर्म म्हणजे कोणते? याचा बहुतांश अभ्यास नाहीच.त्यामुळे अनेकदा धार्मिक तेढ निर्माण होऊन वाद विकोपाला जातात. याचे कारण हेच आहे, की धर्म या शब्दाची व्याख्याच आपण समजून घेतलेली नाही.
धर्म निर्माण करताना आधी शास्राचं निर्माण आहे.वास्तू निर्माण करताना जसं आधी वास्तुरचनाकार वास्तुशास्त्र विचारात घेतो तसच धर्म विचारात घेताना धर्मशास्त्र माहिती असणं महत्त्वाचं आहे. काय आहे धर्मशास्त्र? पाहु पुढील भागात.
रामकृष्णहरी