Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्याची पोलिस लेकं बनली ‘मिस महाराष्ट्र’ !

प्रतिभावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव.

0
बीड: जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील मतावळी गावची लेक प्रतिभा बबन सांगळेने मिस महाराष्ट्रचा किताब मिळविला आहे. शेतकरी कुटुंबातील प्रतिभाला मिस महाराष्ट्राचा किताब मिळवल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मतावळी गावची कन्या प्रतिभा बबन सांगळेने मिस महाराष्ट्रचा किताब मिळवत बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. शेतकरी कुटुंबातील प्रतिभाने मिस महाराष्ट्राचा किताब मिळवल्याने तिचं सर्वत्र कौतुक होतंय. प्रतिभा सध्या पोलीस दलात कार्यरत आहे. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रतिभाने मिळवलं हे यश सांगळे कुटुंबीयांची मान अभिमानानं उंचावणार आहे.
प्रतिभाला आधीपासूनच काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा होती. मागच्या काही दिवसांपासून तिला मिस महाराष्ट्राचा किताब खुणावत होता. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये हा किताब मिळवला.
प्रतिभा पोलीस दलात कार्यरत असून ती कुस्तीचं मैदानही चांगल्याप्रकारे गाजवते. त्याचबरोबर मॉडेलिंग आणि वाचनाचा छंद देखील प्रतिभाला आहे. आता ती मिस इंडिया होण्याचं स्वप्न उराशी बाळगुन आहे. त्यासाठी तीचे प्रयत्न चालू झाले आहेत. प्रतिभाने एकीकडे पोलीस दल दुसरीकडे कुस्ती आणि तिसरीकडे मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सगळ्यांचे स्त्रियांसमोर एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. मिस महाराष्ट्र या घवघवीत यशानंतर मिस वर्ल्ड होण्याची तिची आता इच्छा आहे. त्यासाठी ती प्रयत्नदेखील करत आहे. या सगळ्या यशानंतर पोलिस दलासह बीड जिल्ह्यामध्ये तिचं कौतुक झालेला पाहायला मिळते.
Leave A Reply

Your email address will not be published.