Take a fresh look at your lifestyle.

मनोहर भोसलेच्या पोलिस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ !

बारामती न्यायालयात झाला असा युक्तिवाद !

0

बारामती : संत श्री. बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दि. १० सप्टेंबरपासून पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर भोसले (वय २९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या पोलिस कोठडीत  बारामती न्यायालयाने आज आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे.

दि.११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर भोसले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. आज ,गुरुवारी (दि. १६) रोजी ती संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे  हजर करण्यात आले. मागील वेळी प्रमाणे गुरुवारीही मनोहर भोसले याच्या भक्तानी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.

भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले. सरकार पक्षाकडून ॲड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले. मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करायची आहे, मनोहर भोसलेकडे गुन्ह्यातील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे, त्यामुळे पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलानी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत त्यात तीन दिवसांची वाढ केली.

शुक्रवारी (दि. १०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेत बारामतीत आणत अटक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.