Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून दिवसातून अनेकदा हात उंचवा !

'असे' होतील फायदे!

आपले हात खाली सोडलेले असणे ही हातांची सामान्य स्थिती आहे. मात्र दिवसातून अनेकदा हात डोक्याच्या वर उंचाविल्याचेही विविध फायदे आहेत. जसे की, शरीराचे पचनतंत्र सुधारण्यास मदत होऊन अन्नपचन व्यवस्थित होते. इतरही अनेक फायदे होतात. त्यावर एक नजर टाकूयात…
● पाठीच्या कण्याला आवश्यक तितका ताण मिळतो आणि त्यामुळे ‘पोश्चर’, म्हणजेच मणक्याची स्थिती सुधारण्यास मदत होते.
● दिवसभर कॉम्प्यूटरवर काम करावे लागते असेल किंवा सतत झुकून काम करावे लागते, त्यांच्यासाठी हात वर करणे हा व्यायाम विशेष फायदेशीर आहे.
● डोक्यावर हात उंचाविल्याने आपले अवयव पूर्वस्थितीला येण्यास मदत होते. तसेच या व्यायामामुळे पाठ, हात, खांदे, आणि पोटाच्या स्नायूंना पुरेसा ताण मिळतो.
● ज्यांच्या शरीरामध्ये वॉटर रीटेन्शनची समस्या आहे, त्यांनी पाणी प्यायल्यानंतर दोन्ही हात काही वेळाकरिता उंचवावेत. अशाने शरीरातील अतिरिक्त पाणी शरीरामध्ये साठून न राहता ते शरीराच्या बाहेर टाकले जाते.
● बद्धकोष्ठाचा असणाऱ्या व्यक्तींनी हा व्यायाम नियमित करावा. त्याबरोबरच प्रत्येक भोजनाच्या वीस ते तीस मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे.
● हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम ताठ उभे रहा. दोन्ही हात डोक्याच्या वर उंच करा, हात ताठ ठेवून दोन्ही हातांचे तळवे नमस्कार केल्याप्रमाणे जुळवा. हात डोक्याच्या वर उंचाविताना संपूर्ण शरीराला हलका ताण द्यावा. ही स्थिती एक मिनिटभर ठेवा. हा व्यायाम सलग तीन वेळा, एक-एक मिनिटा करिता करा.