Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर ! स्वस्तात सोनं खरेदीची संधी!

जाणून घ्या कसं खरेदी करणार?

0
सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजना 2021-22 चा नववा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत तुम्ही 14 जानेवारीपर्यंत स्वस्तात सोने खरेदी करू शकता. ही योजना सोन्याची भौतिक मागणी कमी आणि त्याच्या खरेदीमध्ये वापरलेली घरगुती बचत आर्थिक बचतीमध्ये हस्तांतरित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
हे सोने रोखे, सर्व बँका, मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड यांच्यामार्फत विकले जाते. याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा तर 8 वर्षांनी मॅच्युअर कालावधी आहे. जर तुम्हाला 5 वर्षानंतरच हे सोने विकायचे असेल तर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा करानुसार 20.80 टक्के शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही 8 वर्षे ठेवले आणि बॉण्ड्स बॉण्ड्स मॅच्युअर झाले, तर तुम्हाला ते विकून कमावलेल्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. सोने खरेदी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवा!
▪️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या योजनेची किंमत 4,786 रुपये प्रति ग्रॅम नक्की केली आहे.
▪️ ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमतीपेक्षा 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत देण्यात येणार आहे.
▪️ अर्जाचे पेमेंट डिजिटल मोडद्वारे करावे लागते.
▪️ खरेदीसाठी इश्यू किंमत सेबीच्या अधिकृत ब्रोकरला द्यावी लागते.
▪️ सदर बाँड विकल्यानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा केले जातात.
▪️ सॉवरेन गोल्ड बॉन्ड इश्यू किमतीवर वार्षिक 2.50% निश्चित व्याज दर आहे.
▪️ सदर रक्कम दर 6 महिन्यांनी खात्यात जमा केली जाते.

▪️ या योजनेत स्लॅबनुसार कर भरावा लागतो.
▪️ याच्या गुंतवणूकीसाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
▪️ गोल्ड बाँडसाठी सोन्याचा दर 999 शुद्ध सोन्याच्या बंद किंमतीच्या सरासरीच्या बरोबरीचा आहे.
अडचण आल्यास तक्रार कुठे करायची?
▪️ प्राप्ती कार्यालयाचे नोडल अधिकारी (RO) संपर्काचे पहिले ठिकाण असेल.
▪️ सेंट्रल बँकेने सांगितले की प्राप्ती कार्यालय म्हणजे बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीएचआयएल), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (एनएसई आणि बीएसई).

▪️ जर समस्येचे निराकरण झाले नाहो तर आरओमधील विस्तार फ्रेमवर्कद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल.
▪️ दुसरीकडे, तक्रार दाखल केल्यापासून एक महिन्याच्या आत प्रतिसाद मिळाला नाही तर किंवा गुंतवणूकदार आरओच्या उत्तराने समाधानी नसल्यास तो [email protected] वर रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतो.
Leave A Reply

Your email address will not be published.