कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाचे ढग वाढतच चालले आहे. एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी येथील राजगोंडा पाटील या प्रगतशील शेतकऱ्याने एफआरपीचे तीन तुकडे होऊ नयेत एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, जो नेता एफआरपीसाठी पुढाकार घेईल त्याला आपली बागायती एक एकर जमीन बक्षीस देईन.
पाटील यांनी एकप्रकारे महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदार यांना आव्हान दिले आहे. पाटील यांची स्वतःची 18 एकर बागायती जमीन असून यामध्ये ते मुख्यत्वे करून ऊस पीक घेतात.
सध्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राजकारणी फक्त दावे-प्रतिदावे करत आहेत. त्यामुळे हा प्रश्न प्रत्यक्षात निकाली निघावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.