पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य आवारात आज (रविवारी) झालेल्या लिलावात 37 हजार 962 कांदा गोण्यांची आवक झाली.पहिल्या 1 /2 लॉटला प्रतिक्विंटल 2700 ते 3 हजार 25 एवढा बाजार भाव मिळाला.
एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2200 ते 2600, दोन नंबरला 1300 ते 2100, तीन नंबरला 600 ते 1200, तर चार नंबरला 200 ते 500 एवढा बाजार भाव मिळाला.