Take a fresh look at your lifestyle.

उद्यापासून मिळणार तिसरा ‘प्रिकॉशन’ डोस !

नवी दिल्ली : सध्या देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळेच देशात उद्या म्हणजेच 10 जानेवारीपासून कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लसीचे डोस देण्याची घोषणा केली होती. याशिवाय, पात्र लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस लागू देण्यात येणार असल्याचीही घोषणाही करण्यात आली. सरकार याला बूस्टर डोस ऐवजी प्रिकॉशन डोस असे म्हणत आहे.
15 ते 18 वयोगटातील लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले असले तरी आता पात्र असलेल्या लोकांना तिसरा डोस देण्याचा मोहिम 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. Co-WIN अॅपवर प्रिकॉशन डोस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन 8 जानेवारीपासून सुरू झाले आहे.

📌 प्रिकॉशन डोस कोणाला मिळणार?
1. फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्स आणि कॉमोरबिडीटी असलेले ज्येष्ठ नागरिक तिसऱ्या डोससाठी पात्र आहेत.
2. प्रिकॉशनरी डोस घेताना डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, परंतु डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
3. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे. त्यामुळे, एप्रिल 2021 च्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमचा दुसरा डोस मिळाला असेल, तरच तुम्ही हा डोस घेण्यासाठी पात्र असाल. अन्यथा, तुम्हाला तुमचा दुसरा डोस मिळाल्यानंतर 39 आठवडे होईपर्यंत वाट पाहावी लागेल.

4. जर तुम्ही पहिले दोन्ही डोस Covishield चे घेतले असतील, तर तुमचा तिसरा डोस देखील Covishield असेल. हाच नियम कोवॅक्सीनसाठी देखील आहे. सरकारने लस मिसळण्यास परवानगी दिलेली नाही.
5. यासाठी Co-Win वर नवीन नोंदणीची गरज नाही. तुम्हाला साइटवरून अपॉइंटमेंट्स बुक करता येणार आहे किंवा थेट लसिकरण केंद्रावर जाऊन तुम्ही हा डोस घेऊ शकता.
6. मतदार ओळखपत्र, आधार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ही आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेली कागदपत्रे आहेत. म्हणजेच तिसरा डोस घेताना तुम्ही ही कागदपत्रे दाखवू शकता.
7. हे लसीकरण सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत केले जाते.

📌 बूस्टर डोस किती गरजेचा
अनेक देश त्यांच्या नागरिकांना असे बूस्टर डोस देत आहेत. भारतात, याला बूस्टर डोस असे न म्हणता प्रिकॉशन डोस म्हटले जात आहे. हा तिसरा डोस लागू करण्याचा निर्णय अलीकडेच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत जागभरात झालेली वाढ लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. भारतातही केसेस झपाट्याने वाढत आहेत आणि 24 नोव्हेंबर रोजी समोर आलेला Omicron व्हेरिएंट देखील यासाठी कारण असल्याचे मानले जाते.