Take a fresh look at your lifestyle.

कलावंतांकडे बघण्याचा दृष्टीकोन इतक्या खालच्या पातळीचा असू शकतो…?

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी घेतली 'त्या' वादात उडी !

 

 

शिरूर : ‘राष्ट्रवादी पार्टी म्हणजे रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे’ असे विधान विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिरूर येथे एका कार्यक्रमात केले होते. त्याची धूळ अजूनही खाली बसायला तयार नाही. त्यांच्या या विधानावर कलाक्षेत्रातून निषेध वर्तवला जात आहे.आता या वादात सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी उडी घेतली आहे. 

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विधानावर चोख प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात की, ‘प्रवीण दरेकर यांचे किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांचे असे विधान चूकच आहे त्याचा मी निषेध करते.कुठल्याही महिलांवरती किंवा कलाकारांवर असे विधान करणे हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही कलाकार मागील दोन वर्षांपासून तोंडाला रंग लावून तुमचे मनोरंजन करत आहोत हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरतात.

राष्ट्रवादी पक्ष आम्हा कलाकारांच्या मदतीला नेहमीच धावून आलेला आहे…..’ पुढे प्रिया बेर्डे सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत असेही म्हणाल्या की, प्रवीण दरेकर यांनी केलेलं हे विधान याच गोष्टीला अनुसरून आहे. लोककलावंत, तमाशा कलावंत ह्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही इतक्या खालच्या पातळीचा असू शकतो याचं मला वैषम्य वाटतं…लोककलावंत, लावणीकलावंत हे अंगभर कपडे घालून लोकांसमोर आपली कला सादर करत असतात. ते कुठेही मिनिस्कर्ट किंवा शॉर्टस घालून आपली कला सादर करत नाहीत तरीही आजही त्यांच्याकडे याच दृष्टीने पाहिले जाते.