Take a fresh look at your lifestyle.

सैनिक बँकेच्या उपाध्यक्षपदी भिमाजी साठे यांची बिनविरोध निवड !

बँकेच्या प्रगतीसाठी काम करण्याचा मनोदय.

पारनेर : तालुका सैनिक सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी हंगा येथील भिमाजी साठे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपाध्यक्ष शिवाजी सुकाळे यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती त्यानुसार सहाय्यक निबंधक पारनेर गणेश औटी यांच्या अध्यक्षतेखाली भिमाजी साठे यांची निवड जाहीर करण्यात आली
भिमाजी साठे यांचा उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज असल्याने त्यांच्या नावाची सूचना  संचालक शिवाजी सुकाळे यांनी केली तर संचालक बबनराव सालके यांनी अनुमोदन केले त्यानुसार बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश औटी यांनी अधिकृत जाहीर केले.
निवडीनंतर बोलताना बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे म्हणाले,पारनेर तालुका सहकारी बँकेच्या नगर जिल्ह्यात श्रीगोंदा ,कर्जत, जामखेड अशा एकूण चार शाखा असून ठेवी 140 कोटी तर कर्जवाटप 100 कोटीचे आहे. यावेळी संचालक नामदेव काळे, संजय तरटे, संतोष गंधाडे, श्रीकांत तोरडमल श्री दत्तात्रेय सोले पाटील भास्कर पोपळघट शिवाजी सुकाळे बबनराव सालके मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे उपस्थित होते. उपाध्यक्ष साठे यांनी अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.