Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून त्याचं शरीर दगडाप्रमाणे होतंय!

आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरं आहे !

शीर्षक वाचून थोड आश्चर्य वाटलं असेलं परंतु हे खरं आहे. युनायटेड किंगडममध्ये एका व्यक्तीचं शरीर चक्क दगडाचं बनत चाललं आहे. असं होण्यामागे कारण म्हणजे त्याचे स्नायू हाडांमध्ये बदलत आहेत. यामुळे तो व्यक्ती प्रचंड अस्वस्थ आहे. आता त्याची शारीरिक हालचाल देखील जवळपास बंद झाली आहे.
माहितीनुसार, या व्यक्तीचं नाव जो सूच असून त्याचं वय केवळ 29 वर्ष आहे. त्याला स्टोन मॅन सिंड्रोम नावाचा आजार आहे. सध्या या आजाराने जगभरातील केवळ 700 लोकं ग्रस्त असल्याची माहिती आहे.
जो बोलताना म्हणतो की, मी मॉन्स्टर बनत चाललोय असं वाटतंय. या आजारामुळे ‘जो’ला व्हिलचेअरची मदत घ्यावी लागते. खाणं किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागतं आहे.
‘जो’ वर शस्त्रक्रिया देखील होऊ शकत नाही. कारण त्याच्या शरीरातील हाडांची सतत वाढ होते आहे. जेव्हा स्नायू हाडांमध्ये बदलतात त्यावेळी शरीरात चाकू टोचल्याप्रमाणे वेदना जाणवत असल्याचं, जो सांगतो. समोरून पाहिल्यावर जो नीटनेटका दिसतो मात्र त्याची परिस्थिती फार गंभीर आहे.