Take a fresh look at your lifestyle.

भगवंतावरचा दृढनिश्चयच स्थिरता देतो !

येरझार व्यर्थ होण्याची भिती आहे.

आपण भाविक, भक्त असाल तर आपण नको त्या गोष्टीच अडकण्याची मोठी भिती आहे. त्यातही अंधभक्तीचे शिकार होण्याचा संभव अधिकच.
आपण भक्ती कशासाठी करीत आहात?मुळात भक्ती म्हणजे काय हे समजले आहे का?
आपली भक्तीची व्याख्या, धारणा काय आहे?मंदिरात जाणे,उदबत्ती लावणे,गंध अक्षता,फुलं वहाणे अशी भक्ती सर्सकट चालु आहे. घड्याळाच्या काट्यावर ही भक्ती चालू आहे. पण अगदी खरं सांगा?तुमचं मागणं संपलं आहे का?तुमच्या देविदेवतांकडे किती मागण्यांच्या फाईल धुळखात पडल्या आहोत?मागण्या पुर्ण झाल्या आहेत का?

माऊली हरिपाठात म्हणतात,
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी ।
वायांची उपाधी करिसी जनां II
भावबळें आकळे येरवी नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २ ॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
यत्‍न परोपरी साधन तैसें ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४ ॥

अर्थ:सज्जनहो कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचें आचरण केलें, तरी हरीवर दृढ विश्वास नसेल ती सफळ होणार नाहीत, मग त्याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण कां करतां ? कारण असं पकडलेलं साधन व्यर्थ ठरणार आहे हरीच्या ठिकाणीं विश्वास ठेवून त्याचें भजन केल्यानें तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणें आपल्या हस्तगत होतो, अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही.पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणें ते पार्‍याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणें हरिनामावांचून इतर साधनांनी भगवत्प्राप्ति होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. हे कष्ट तुम्हा आम्हाला होऊ नयेत यासाठी श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की, माझे गुरु निवृत्तिनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत.
त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्यें दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधानें माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला.म्हणूनच माऊली म्हणतात, मज ह्रदयी सदगुरु जेणे तारीला हा संसारपुरु।म्हणोनि विषेश अत्यादरु।विवेकावरी।।सतविवेक जागृती होणे हे गुरुकृपेचे फलित आहे. माऊली म्हणतात श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा।इतरांचा लेखा कोणकरी।।आता श्रीगुरु कोण? आणि इतर कोण? हे पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी