Take a fresh look at your lifestyle.

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला कोरोनाची लागण! 

अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने वाढली चिंता! 

पुणे : अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि ‘अनाथांची माय’ या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने चिंता वाढली आहे.
ममता सिंधुताई यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करीत याबद्दलची माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी काळजी घेण्याचे आवाहन ममता यांनी केले आहे.
हडपसर येथील मांजरी परिसरात असलेल्या सन्मती बाल निकेतन संस्थेत माईंचं पार्थिव आणण्यात आले होते . या ठिकाणी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ठोसरपागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ममता या तिथे उपस्थित होत्या. अंत्यसंस्कारासाठी आणि सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.