Take a fresh look at your lifestyle.

भारतात एकूण किती रंगाचे पासपोर्ट दिले जातात? 

चला तर सविस्तर माहिती जाणून घेवूयात !  

माहितीनुसार, भारतात एकूण तीन प्रकारचे आणि तीन रंगाचे पासपोर्ट दिले जातात. त्याचे एक खास महत्व आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना पासपोर्ट आवश्यक असतो. तसेच त्या देशाचा व्हिसा देखील घ्यावा लागतो. सध्या भारतात निळा, मरून आणि पांढरा अशा तीन रंगांचे पासपोर्ट वापरले जात आहेत. चला, तर याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…  
निळा रंग : सर्वसामान्य नागरिकांसाठी या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. यामुळे देशात तसेच परदेशात सर्वसामान्य नागरिक आणि महत्वाच्या व्यक्ती यांच्यातील फरक ध्यानात येतो.
मरून रंग : हा पासपोर्ट असलेल्यांना परदेशात जाताना व्हिसाची आवश्यकता नसते. इमिग्रेशनमधून त्यांना त्वरित रिकामे केले जाते. हा पासपोर्ट मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो.
पांढरा रंग : हा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली मानला जातो. कारण अति महत्वाचे सरकारी अधिकारी, आणि नेते यांना हा पासपोर्ट मिळतो. परदेशात कस्टम आणि इमिग्रेशन अधिकारी असा पासपोर्ट सहज ओळखू शकतात. यामुळे अशा व्यक्तींना फार वेळ न घालवता विमानतळा बाहेर सोडले जाते.